Fri, Jul 10, 2020 00:19होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : आधी मतदान मग लगीन....

औरंगाबाद : आधी मतदान मग लगीन....

Published On: Apr 23 2019 11:32AM | Last Updated: Apr 23 2019 11:42AM
कन्नड : प्रतिनिधी

तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून शासकीय स्तरावर मोठी जनजागृती करण्यात आली आहे. तालुक्यातील हिवरखेडा गौ. येथील मिथुन सुभाष जाधव या नवरदेवाने आपले मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे.

मिथून जाधव यांचे आज (ता.२३) लग्न असून ते चालीळगांव येथे जाणार असून लग्न सकाळचे आसल्याने नातेवाईकांची उन्हामुळे लवकर निघण्याची तयारी सुरु होती. तेवढ्यात नवरदेवाने सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रथम हिवरखेड़ा बूथ क्रमांक दोन वर जावून मतदान करून मतदानाचे महत्व इतरांना पटवून दिले. हळद आणि डोक्याला मंडूळया बांधलेला नवरदेव मतदान केंद्रात आल्याने मतदान अधिकारी व इतर मतदार यांनी नवरदेवाचे अभिनंदन केले.

जंभाळा येथे नवरदेवाने केले मतदान 

तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासकीय स्तरावर मोठी जनजागृती करण्यात आली आहे. तालुक्यातील जांभाळा येथील अनिल नामदेव दाणे या नवरदेवाने आपले मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अनिल दाणे याचे आज (ता.२३) दुपारी लग्न असून ते लासुरस्टेशन येथे लागण्यास जाणार असल्याने लगीन घाईत मतदानाचा हक्क बजावला. व-हाडी व नातेवाईकांची उन्हामुळे लवकर निघण्याची घाई सुरु होती. असे असताना नवरदेवाने प्रथम जंभाळा बूथ क्रमांक १०९ वर जावून मतदान करून मतदानाचे महत्व इतरांना पटवून दिले.