Thu, Jul 09, 2020 07:10होमपेज › Aurangabad › औरंगाबाद- नगर रस्‍त्‍यावर भरधाव कारची झाडाला धडक, ४ ठार 

औरंगाबाद- नगर रस्‍त्‍यावर भरधाव कारची झाडाला धडक, ४ ठार 

Last Updated: Nov 30 2019 12:35PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद- नगर रस्त्यावर भाडगाव येथे रस्‍त्‍याकडेला असलेल्‍या वडाच्या झाडाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये चारजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. 

या विषयी अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्याच्या शेवली तालुक्‍यातील सहा तरूण शिर्डी येथे दर्शनासाठी चालले होते. त्‍यांची गाडी औरंगाबाद - नगर रस्त्यावरील गोलवाडी फाटा येथे आली असता, रस्‍त्‍याच्या कडेला असलेल्‍या एका मोठ्या वडाच्या झाडाला त्‍यांच्या भरधाव गाडीची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात जालन्याचे चारजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन गंभीर आरोपींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

यामध्ये दत्ता वसंतराव डांगे (वय.२७) राहणार सेवली जालना, अमोल नंदकिशोर गव्हाणकर (22) राहणार शेवली, आकाश प्रकाश भोरे (30), अक्षय सुधाकर शीलवंत (30) राहणार शेवली हे चौघे ठार झाले. हा अपघात शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद नगर रस्त्यावरील गोलवाडी फाटा येथे घडला आहे. छावणी पोलिसांनी चौघांचे मृतदेह घाटी रूग्‍णालयात पाठवले आहेत