Wed, Jul 08, 2020 10:20होमपेज › Aurangabad › पालिकेचा निर्दयीपणा; 70 वर्षे जुन्या झाडाचा 10 हजारात सौदा!

पालिकेचा निर्दयीपणा; 70 वर्षे जुन्या झाडाचा 10 हजारात सौदा!

Published On: Apr 28 2018 11:54AM | Last Updated: Apr 28 2018 12:14PMऔरंगाबाद : गणेश खेडकर

अडीच हजार लोकांना ऑक्सिजन देणारे शहानूरमियॉ दर्गा चौकातील 70 वर्षे जुने झाड मनपाने केवळ दहा हजार रुपयांत विक्री केले. झाड तोडा आणि घेऊन जा या अटीवर हा सौदा झाला. विशेष म्हणजे, मनपा अधिकार्‍यांना या झाडाचे वजन किती भरले? त्याचीही माहिती नाही. मनपा अधिकार्‍यांशी संगनमत करून झाडे तोडून घेऊन जाणार्‍या काही विशेष टोळ्या शहरात सक्रिय आहेत. 

संग्रामनगर उड्डाणपुलावरून शहरात येणार्‍या वाहनांना शहानूरमियॉ दर्गा चौकात ऐन रस्त्यावर चिंचेचे झाड आडवे येत होते. या झाडामुळे वाहतुकीला अडथळा होत असून सोमवारी तर प्रचंड वाहतूक ठप्प होते, असे पत्र मनपाला दिले होते. तसेच,  झाड तोडावे अशी मागणी  पोलिसांनी महापौर आणि मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानेच हे झाड तोडण्यास मनपाला बळ दिले. त्यानंतर गुरुवारी (दि. 26)  चिंचेचे झाड तोडले. रस्ता खोदून जमिनीच्या आतून झाडाचे खोड काढून घेण्यात आले. दरम्यान, मनपाने हे झाड किती रुपयांत विक्री केले याचा दै.  पुढारीने मागोवा घेतला असता केवळ दहा हजार रुपयांत झाड विकल्याची माहिती समोर आली. 

चिंचेच्या या झाडावर अनेकांनी वेगवेगळे फलक लावले होते. त्याला खिळे ठोकले होते. काही महिन्यांपूर्वी अपघात झाल्यावर हा खिळा एकाच्या डोळ्याजवळ लागला होता. तसेच येथे अपघाच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अखेर झाड  तोडण्याचा निर्णय घेतला. दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून घेऊन झाड तोडून घेऊन जाण्यास मंजुरी देण्यात आली. - विजय पाटील, उद्यान  अधीक्षक, मनपा. 

या 70 वर्षे जुन्या झाडाला दहा वर्षांपासून आम्ही संरक्षण देत होतो. उड्डाणपुलाचा कठडा आणि फुटपाथ तोडून रस्ता रुंद करता येत होता, परंतु  तसे न करता पोलिस आणि मनपाने मनमानी करीत अडीच हजार लोकांना ऑक्सिजन देणारे झाड तोडले. किशोर पाठक, सदस्य, वृक्षसंवर्धन समिती

Image may contain: one or more people, tree, plant, sky, outdoor and nature

Image may contain: 1 person, smiling, tree and outdoor

Image may contain: sky, outdoor and nature

 

Tags : Aurangabad, Municipal Carportaion,Tamaring Tree,10 thousend rupees,Oxygen