Sat, Jul 04, 2020 00:25होमपेज › Aurangabad › औरंगाबादचे आमदार अतुल सावे मंत्रिमंडळात; लवकरच घोषणा

औरंगाबादचे आमदार अतुल सावे मंत्रिमंडळात; लवकरच घोषणा

Published On: Jun 15 2019 5:30PM | Last Updated: Jun 15 2019 5:30PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळणार आहे. सावे यांनी दैनिक पुढरीशी बोलताना याला दुजोरा दिला. पक्षश्रेष्ठींनी मला मुंबईला बोलावले आहे. मंत्रिमंडळातील माझा समावेश निश्चित असून अधिकृत घोषणा आज सायंकाळी मुंबईत केली जाईल, असे सावे यांनी सांगितले.

मंत्रिपदासाठी सावे आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्यात चुरस होती. औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीने युतीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. वंचित आघाडीचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी सावे यांच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे बंब यांचा पत्ता कापला आहे. 

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर याना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेतील पराभवानंतर राज्यात मंत्रिपद मिळविण्याचे खैरे यांचे स्वप्न भंगले आहे.