Tue, Aug 11, 2020 21:41होमपेज › Aurangabad › जुगार अड्ड्यावर छापा, २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा, २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Published On: Jun 07 2019 5:38PM | Last Updated: Jun 07 2019 4:55PM
कन्नड (औरंगाबाद) : प्रतिनिधी 

कन्नड तालुक्यातील आंधानेर फाटा परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी ६ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये आकरा जुगाऱ्यांसह २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई करण्यात आली. 

आंधनेर फाटया परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्याविषयी शहर पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक विजय माणिकराव आहेर, पो. ना. कैलास करवंदे, आर. यू. बोंदरे, मयूर पाटील, योगेश ताटे यांनी छापा मारून ही कारवाई केली. यावेळी शेख मजीद शेख सत्त्तार (रा. नरसिंगपुर), सलीम यसीम पठाण (नितिन नगर), जाकिरअली उस्मानअली खासाब (बंगला कन्नड), रविंद्र तायड़े (रा. शनि मंदिर), शेख अकबर शेख रुस्तम बनशेंद्रा, गिरधारी दिंगबर परदेशी (रा. समर्थ नगर), शेख सद्दाम शेख सलीम (रा. नितीन नगर), अनिल मलकान चव्हाण (रा. हिवरखेड़ा गौ.), जफरअली मकसूद अली गौरीपूरा (रा. बंगला कन्नड), मनोज यशवंत ठाकुर (रा.धुळे), राहुल सोनावणे (रा.धुळे) यांच्या मोटारसायकल, मोबाइल, जुगार साहित्य, टेबल, रोख मिळून २ लाख ३५ हजार ९०४ मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

तर पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय आहेर पुढील तपास करत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार खेळणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.