Thu, Jul 02, 2020 11:13होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दत्त जयंती उत्साहात साजरी

औरंगाबाद : दत्त जयंती उत्साहात साजरी

Published On: Dec 22 2018 5:02PM | Last Updated: Dec 22 2018 4:50PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगपुर भागातील श्री दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव शनिवारी दि.(२२) रोजी उत्साहात पार पडला. यावेळी दत्त भक्तांचा जनसागर दर्शनासाठी लोटला. या ठिकाणी सकाळी गुरू चरित्राचे पारायण संपन्न होऊन दहा वाजता आरती पार पडली. शहरातील पुरातन असलेल्या दत्त मंदिराची सहा ते सात पिढ्यान पासूनची परंपरा जपत हा पारंपरिक आणि धार्मिक सोहळा पार पडल्याचे मंदिराचे पुजारी भाऊसाहेब (बंडू गुरुजी) यांनी या वेळी माहिती दिली.

ते म्हणाले की, औरंगपुरा स्थित दत्त मंदिर हे पुरातन असून अंदाजे १६० वर्षा पेक्षा जास्त वर्षे या मंदिराला झाली आहेत. त्यांची सहावी पिढी सध्या मंदिराचे जतन करते, मंदिरामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या सप्तमीपासून परायनाला सुरुवात होते. ७ ते ८ जण गुरुचरित्राच्या परायनाला बसतात. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला सात दिवसीय परायनाची सांगता होते. 

तसेच मंदिरामध्ये श्री दत्त भजनी मंडळ, श्री बाळकृष्ण मंदिर भजनी मंडळ, श्री अमृतेश्वर भजनी मंडळ, श्री नाथ मंदिर भजनी मंडळ, अभिनव भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, परणेरकर महाराज भजनी मंडळ आणि गीतांजली संगीत विद्यालय, शोभना कुलकर्णी यांचे भक्ती गीताचे कार्यक्रम सात दिवसाच्या उत्साहात संपन्न होतात. 

शनिवारी विनोद शास्त्री पाठक यांनी जन्माचे किर्तन करत दत्त जन्म सोहळा पार पडला. रविवारी महाप्रसाद आणि सोमवारी गोपाळ काल्याने उत्सवाची सांगता होणार असल्याचे सांगितले.