Thu, Jan 23, 2020 16:44होमपेज › Aurangabad › आंदोलक रुळावर; रेल्वे चार तास फलाटावर

आंदोलक रुळावर; रेल्वे चार तास फलाटावर

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. 9) पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान आंदोलकांनी शिवाजीनगर परिसरात रूळ ताब्यात घेतल्याने रेल्वेस्थानकावर रेल्वे तब्बल तीन तास थांबवून ठेवाव्या लागल्या. दरम्यान, आंदोलक शांत झाल्यानंतर दुपारी साडेचारच्या नंतर रेल्वेस्थानकात थांबवून ठेवलेल्या रेल्वे रवाना करण्यात आल्या. दरम्यान, विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे नांदेडहून सुटणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्या, अशी माहिती स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे यांनी दिली. 

सकाळपासूनच आंदोलनकर्ते रस्त्यांवर उतरले होते. सकाळची जनशताब्दी वेळेनुसार धावली, परंतु त्यानंतर हळूहळू आंदोलकांनी रेल्वे रुळाचा ताबा घेत शिवाजीनगर गेटजवळ आंदोलक रुळावरच झोपले. दुपारी नांदेडहून मुंबईकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस जालना येथेच थांबवण्यात आली.