Fri, Jul 10, 2020 03:15होमपेज › Aurangabad › अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

Published On: Sep 22 2019 7:50PM | Last Updated: Sep 22 2019 7:15PM
वरठाण : प्रतिनिधी

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सध्या अवैधरित्या वाळू वाहतूक प्रकरणी तहसिलदारांनी ट्रॅक्टरवर कारवाई कारवाई केली आहे. यामुळे परिसरात अवैधररित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांना चाप बसली आहे. जप्त केलेला ट्रॅक्टर पोलिस पाटील यांनी कार्यवाहीसाठी बनोटी दुरक्षेत्रात जमा केला.   

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, गोंदेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक आणि विक्री करण्याचा व्यवसाय जोरदार सुरू आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची माया जमा केली जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा परिसरातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूने भरलेले टॅक्ट्रर रात्री व दिवसा जोमाने सुरु असल्याची माहिती तहसिलदार प्रविण पांडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी अशाच एका ट्रॅक्टर ट्रॉलीत अवैध वाळू आणली जात होती. त्याची माहिती आधीच तहसिलदारांना भ्रमणध्वनीवरुन मिळाल्याने गोंदेगाव येथील पोलिस पाटील वाल्मिक निकम यांना जप्त करण्याचे आदेश दिले होते. 

वाळुने भरलेला विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत गोदेंगाव येथे पोलिस पाटील यांनी कोतवाल बशीर ठाकुर यांना बरोबर घेऊन टॅक्ट्रर ताब्यात घेतला. तो टॅक्ट्रर त्यांनी पुढील कारवाईसाठी बनोटी पोलिसांच्या ताब्यात दिला.