होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ; आणखीन एक एटीएम मशिन फोडले

औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ; आणखीन एक एटीएम मशिन फोडले

Published On: Jul 14 2019 9:24AM | Last Updated: Jul 14 2019 9:24AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. या चोरट्यांकडून आता पैसेच नाही तर एटीएम मशिनच पळवण्याचे सत्र सुरू केले आहे. आज, रविवार (दि.१४) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मिसबाह कॉलनीतील आणखी एक एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

चोरट्यांनी शुक्रवारी, (दि.१२) रात्रीच्या सुमारास बीड बायपासवरील एटीएम मशिनच पळवून नेले होते. यात तब्बल २५ लाख रुपये लंपास झाले. ही घटना ताजी असतानाच आज, रविवारी चोरट्यांनी पुन्हा छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिसबाह कॉलनीत आणखी एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत काहीही रक्कम चोरीला गेली नाही. मात्र या मशिनमध्ये एकूण किती रक्कम होती याची माहिती पोलिस घेत आहेत.