Thu, Jun 24, 2021 12:23
लोणवाडी शिवारात  तरुणाचा वीज कोसळून मृत्यू

Last Updated: Jun 06 2021 8:02PM

अंधारी पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील लोणवाडी येथील पंचवीस वर्षीय युवकाचा सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

वाचा : औरंगाबाद : लोकांना टोप्या घालून सायबर भामटा बनला कोट्यधीश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील लोणवाडी येथील तरुण पांडुरंग सोनाजी सुलताने (वय.२५) हा आपल्या लोणवाडी शिवारातील उपळीचा माळ गट क्र. २४८ शेतात पेरणीपूर्व मशागतीची शेतातील काडीकचरा जाळपोळ करीत होता. यावेळी अचानक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आपल्या शेतात असलेले लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला. झाडांसह त्याच्यावर वीज कोसळल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही घटना लोणवाडी चे पोलिस पाटील पुंडलिक राकडे यांना दिली. त्यांनी ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला देऊन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या मागे आई वडील तीन भाऊ असा परिवार आहे. सदरील घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार मदन नागरगोजे परमेश्वर शिंदे करीत आहेत.

वाचा : १०० रुपयांचा गांजा अन् ६० हजारांची लाच!