Wed, Feb 19, 2020 01:57होमपेज › Aurangabad › मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे दर्शन

मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे दर्शन

Last Updated: Feb 16 2020 1:45AM

जवान वैभव मुंडे, मंत्री धनंजय मुंडेऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मंत्री धनंजय मुंडे नेहमीच त्यांच्या सामाजिक कामांमुळे चर्चेत असतात. आज औरंगाबाद येथे एका सैनिकाला धनंजय मुंडे यांनी विमानाचे तिकीट काढून देऊन ते पुन्हा चर्चेत आले आहेत. जवान वैभव मुंडे यांचे श्रीनगरला जाणारे विमान उशीर झाल्याने चुकले, तितक्यात मुंबईला निघालेल्या धनंजय मुंडे यांची भेट झाली. व त्यांनी जवान वैभव यांना श्रीनगरचे दुसऱ्या विमानाचे तिकीट काढून दिले. 

वाचा ;औरंगाबाद : झेडपी ‘स्थायी’ सदस्यपदी तिघांची बिनविरोध निवड

सुट्टी संपवून देशसेवेसाठी निघालेल्या परळीतील पांगरी येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे यांची औरंगाबादला येणारी रेल्वेला उशीर झाल्यामुळे त्यांचे पुढील श्रीनगरला जाणारे विमान चुकले. वेळेत जाता आले नाही म्हणून, त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने ते चिंताग्रस्त होते. याचवेळी मंत्री धनंजय मुंडे विमानतळावर भेट झाली. अचानक भेटलेल्या आपल्याच परळी तालुक्यातील पांगरी येथील या जवानाची चौकशी केली, घडलेला प्रकार कळताच आपल्या कार्यालयामार्फत मुंडेंनी तात्काळ जवान वैभव साठी एअर इंडिया च्या AI 442 या विमानाचे औरंगाबाद – दिल्ली – श्रीनगर असे तिकीट काढून दिले.

चिंताग्रस्त असलेल्या जवान वैभव मुंडे सुटकेचा निःश्वास सोडला.  मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे दर्शन घडले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कृतीची महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. 

वाचा ;औरंगाबाद : अपमान सहन न झाल्याने आत्महत्या