Sat, Sep 19, 2020 11:18होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : ३५ लाखांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला

औरंगाबाद : ३५ लाखांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला

Last Updated: Sep 15 2020 11:44AM

गोंदी पोलिसांनी जप्त केलेला गुटखावडीगोद्री (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथ नगर येथे बीडहून औरंगाबादकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. या ट्रकमध्ये अंदाजे ३५ लाख रुपयांचा गुटखा आणि १७ लाखांचा ट्रक असा एकूण ५२ लांखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

बीडहून औरंगाबादकडे ट्रकमध्ये गुटखा जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गोंदी पोलिसांनी सापळा रचला. यानंतर औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथ नगर येथे आज मंग‍ळवारी सकाळी ८ वाजता ट्रक (क्रमांक केए ५६, ५४१३) पकडला. या ट्रकमध्ये कुजलेल्या ज्वारीच्या गोण्याच्या खाली हा गुटखा ठेवण्यात आला होता. सदर गुटखा ३५ लाख रूपये आणि १७ लाखांचा ट्रक असा एकूण ५२ लाखांचा मुद्देमाल जत करण्यात आला. 

ही कारवाई गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलिस कर्मचारी यांनी केली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांत मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : नाशिक : कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी आक्रमक, महामार्ग रोखला

अधिक वाचा : ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा आजपासून सुरू

 "