Tue, Jul 14, 2020 01:27होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : तरुणांची सतर्कता; बचावले ३५ प्रवाशी

औरंगाबाद : तरुणांची सतर्कता; बचावले ३५ प्रवाशी

Last Updated: Oct 23 2019 11:50AM

पुलावर अडकलेली एसटी बस.नाचनवेल : प्रतिनिधी 

एका तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळल्याची घटना घडली आहे. नाचनवेल येथून जवळच असलेल्या नादरपूर येथील अंजना नदीवरील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने पिशोर ते औरंगाबाद जाणारी बस पुलावर पडलेल्या खड्ड्यात जात होती. नादरपूर येथील तरुणांच्या हे लक्षात येताच त्याने आराडाओरड केली. तसेच बस चालकास सांगून बस थांबवली आणि बसमधील तीस ते पस्तीस प्रवाशांना बाहेर काढले.

यावेळी प्रवाशांना खाली उतरवून बस ट्रक्टरच्या सहाय्याने पुलाच्या बाहेर काढण्यात आली. तरूणांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. नादरपूर येथील तरूणांच्या सहकार्याने बस पुन्हा औरंगाबादला रवाना करण्यात आली. यावेळी सचिन निकम, संतोष राजपूत, उत्तम गायकवाड, अनिल चौथमल, समाधान निकम, गणेश सोनवणे, बाबासाहेब शिंदे, निसार शाहा, इसाक शाहा, त्रिंबक काथार, सतिष सोनवणे, अजय निकम, लक्ष्मण बळी, रामेश्वर काथारसह गावातील तरूणांनी बस काढण्यासाठी सहकार्य केले.