Tue, Jul 07, 2020 23:48होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश (video)

औरंगाबाद : सहा तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश (video)

Last Updated: Dec 03 2019 4:15PM

औरंगाबादमधील सिडको एन १ भागात शिरलेला बिबट्या.औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद शहरातील सिडकोतील एन वन परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या आढळल्याने एकच खडबळ उडाली होती, परंतु विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचत तब्बल ६ तासांनी बिबट्याला जेरबंद केले. आज सकाळी एन १ परिसरात बिबट्याची माहिती कळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहचून योग्य सापळ्याची आखणी करत काळा गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या पडक्या घरात बिबटया घुसला होता. त्यानंतर त्या पडक्या घरात चोहुबाजूने जाळी अंथरून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारून त्याला जेरबंद केले.

औरंगाबादमधील सिडको एन १ भागात बिबट्या शिरला आहे. या ठिकाणी बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या शहरातील मुख्य वस्तीत फिरत असल्याने भीती व्यक्त करण्यात आली आहे.

वन खात्याचे अधिकारी आणि पोलिस बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सकाळी उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बिबट्या दिसून आला. तिने आरडाओरड करुन लोकांना बोलावलं. बिबट्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

वन विभागाचे पथक बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे भरवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढले आहे.