Mon, Jul 13, 2020 05:58होमपेज › Aurangabad › खेळणा धरणात ९६ टक्के जलसाठा ; धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर

खेळणा धरणात ९६ टक्के जलसाठा

Published On: Aug 15 2019 12:09PM | Last Updated: Aug 15 2019 11:53AM

खेळणा धरणसिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड तालुक्यातील खेळणा नदीवरील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात ९६ टक्के जलसाठा  झाला आहे. धरणाच्या क्षेत्रातून पाण्याची आवक अजूनही कमी प्रमाणात का होईना सुरू असल्याने लवकरच खेळणा धरण ओव्हरफ्लो होण्याची आशा आहे. 

खेळणा धरण २०१५ वर्षीच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाले होते. धरण यंदाच्या हंगामात ओव्हरफ्लो होणार निश्चित आहे. धरण झाल्यावर धरणाच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाठाद्वारे किमान दोन - तीन पाणी मिळेल, अशी आशा आहे.