Sun, Sep 20, 2020 06:19होमपेज › Aurangabad › औरंगाबाद जिल्ह्यात ९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात ९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

Last Updated: Aug 07 2020 10:19AM

संग्रहीत छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या १५८७० झाली आहे. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ५१३ झाला आहे. तर आजपर्यंत ११६६७ रुग्ण बरे झाले असून सध्या ३६८१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

 *मनपा (७४)*

समृद्धी नगर एन चार सिडको (३), भानुदास नगर (२), नारेगाव (१), मधुरा नगर (१), मयूर नगर (१), मोची गल्ली (२), क्रांती नगर (१), रोकडा हनुमान कॉलनी (२), जालान नगर, बन्सीलाल नगर (१), शिवाजी नगर, सूतगिरणी रोड (२), न्यू गणेश नगर, अहिल्या नगर चौक  (१),  एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको (१),  सैनिक नगर, पडेगाव रोड (१), नक्षत्रवाडी (१), शिवाजी नगर (१),  देशमुख नगर, गारखेडा (१), मोचीवाडा, पद्मपुरा (१), एकनाथ नगर (१),  उस्मानपुरा (१), कर्णपुरा (१),  होनाजी नगर, जटवाडा रोड (१), श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी (१),  जय भवानी नगर (५), बालाजी नगर (२), मिल कॉर्नर (१), उल्कानगरी, गारखेडा (१),  विद्यानिकेतन कॉलनी (१), एन सात, अयोध्या नगर (१), ब्रिजवाडी (३), माणिक नगर, नारेगाव (३), एन दोन, जे सेक्टर (२), गोलवाडी (१), राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर (२), सौजन्य नगर (१), स्वराज नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), बुद्ध नगर (४), घाटी परिसर (१), अन्य (६), भावसिंगपुरा (२), छावणी परिसर (१), गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा (१)   

*ग्रामीण (२२)* 

खुलताबाद (१), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर (१),  वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (१),  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज (२), ओमसाई नगर, जोगेश्वरी (२),  लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव (१),  फुलंब्री भाजी मंडई  परिसर (२), स्नेह नगर,सिल्लोड (१), सिल्लोड उपविभागीय रुग्णालय  परिसर (१),  शिवाजी नगर,सिल्लोड (१), टिळक नगर,सिल्लोड (२), भराडी,सिल्लोड (२), बोरगाव बाजार, सिल्लोड (१), करमाड (४)

*चार कोरोनाबाधितांचा मृत्यू* 

खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय स्त्री, बजाज नगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 "