Mon, Jul 13, 2020 12:24होमपेज › Aurangabad › शहरातील ८० टक्के पाईपलाईन कुचकामी

शहरातील ८० टक्के पाईपलाईन कुचकामी

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरात पाणीपुरवठ्यासाठी 800 किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे आहे, मात्र त्यांची सध्याची अवस्था वाईट आहे. यातील 650 किलोमीटरच्या लाईन कुचकामी ठरलेल्या आहेत. त्यातील काही किलोमीटरच्या पाईपलाईनचे आयुष्य संपले आहे, तर काहींचे मटेरियल योग्य प्रकारचे नाही, असे निरीक्षण पाणीपुरवठ्यातील तज्ज्ञ डॉ. संजय दहासहस्रे यांनी नोंदविले.

शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करण्यासाठी मनपाकडून डॉ. दहासहस्रे यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. डॉ. दहासहस्रे यांनी आज मनपा आयुक्‍तांसह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांशी प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेविषयी बोलताना ते म्हणाले, औरंगाबाद शहरात एकूण 800 किलोमीटर इतक्या अंतर्गत जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. यातील केवळ दीडशे किलोमीटरची लाईन ही लोखंडी आहे, तर 562 कि.मी.ची पाईपलाईन सिमेंटची, 40 किलोमीटर आरसीसीची आणि 28 कि.मी.ची पीव्हीसी पाईपची आहे. या उर्वरित 650 किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे.