Mon, Jul 06, 2020 22:04होमपेज › Aurangabad › 55 राजकीय गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

55 राजकीय गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर

Published On: Sep 07 2018 12:54AM | Last Updated: Sep 07 2018 12:54AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गुन्हेगार नगरसेवक सय्यद मतीनवरील एमपीडीए ही कारवाई त्याचाचा नमुना ठरली. विशेष म्हणजे, अशाच प्रकारे कारवाई करण्यासाठी तब्बल 55 राजकीय पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. यात चार प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. यापुढे त्या राजकीय गुन्हेगारांवर साधा अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल झाला तरी कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी शहरात सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हेगार त्यांच्या रडारवर आहेत. तसेच, गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर शांत ठेवणयासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच जवळपास दोनशे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील 130 आरोपींना पकडले. त्यांची आयुक्‍तालयाच्या हॉलमध्ये पोलिस उपायुक्‍त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी हजेरी घेतली. सर्वांवर प्रतिबंधात्मक 55 राजकीय गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर कारवाई करण्यात आली. सोबतच यापुढे शांत राहण्याच्या सूचना सर्वांना करण्यात आल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पूर्वीचे गंभीर गुन्हे दाखल केलेले, हद्दपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगारांचा देखील यात समावेश आहे. 55 जणांची यादी पोलिसांनी तयार केली असून, यात चार प्रमुख पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.