Tue, Jul 07, 2020 06:13होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : घाटीत २४ तासात ५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 

औरंगाबाद : घाटीत २४ तासात ५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 

Last Updated: May 25 2020 3:10PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(घाटी) उपचार घेत असलेल्या पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यूत समावेश आहे. एकाच दिवशी पाच जनांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळींची संख्या ५५ वर गेली आहे.

वाचा : औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १३०० वर

कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा २४ मे रोजी रात्री ९.३० वाजता, गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा २४ मे रोजी  रात्री ९.३५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील ७५ वर्षीय महिलेचा पहाटे ३.१५ वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय  महिला रुग्णाचा सकाळी  ६.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

वाचा : औरंगाबाद कोरोना मीटर थांबेना; दिवसागणिक भर सुरुच

या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तर खाजगी रूग्णालयात चार आणि मिनी घाटीत एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या ५५ वर गेली आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात ७० कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.