औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शनिवारी (दि.२३) सायंकाळपर्यत २५ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४३ झाली आहे. यात शहरी भागात २४ तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला आहे.
शुक्रवारी (दि.२२) रात्री जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे मीटर १२१८ वर थांबले होते. शनिवारी सकाळी त्यात २३ रुग्णांची भर पडली. यात सादाफ नगर १, रहेमानिया कॉलनी १, महेमूदपुरा १, औरंगपुरा १, एन-८ येथे १, एन-४, गणेश नगर १, एन-२ ठाकरेनगर २, न्याय नगर ३, बायजीपुरा १, पुंडलिकनगर २, एन-७ बजरंग चौक ३, एमजीएम परिसर १, एन-५ सिडको १, एन १२ हडको १, पहाडसिंगपुरा १, भवानी नगर १, वडगाव कोल्हाटी १ असे एकूण २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
तर दुपारी राजाबाजार आणि एन-4 गणेशनगर या ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण सापडला. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२४३ वर पोहोचली आहे. यामध्ये ६ महिला आणि १९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.