औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. किराडपूरा येथील ७५ वर्षीय आणि सिटी चौक येथील ७२ वर्षीय रुग्णांचा मृत्यूत समावेश आहे. अशी माहिती घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या दोन्ही मृत्यूमुळे औरंगाबाद शहरातील कोरोना बळींची संख्या ४८ वर पोहचली आहे.
वाचा :औरंगाबादेत २३ रूग्ण वाढले, एकूण बाधित १२४१ वर
तसेच शहरात कोरोनाची साखळी तुटत असल्याचे आश्वासक चित्र आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे. शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या यादीत सादाफ नगर (१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१) आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.