भरत साळोखे
Thematic Fund ho Sector फंडांपेक्षा अधिक व्यापक व विविधांगी असतात. एकापेक्षा अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असल्यामुळे Concentration चा धोका कमी होतो आणि त्यामुळे जोखीमही थोडी कमी होते. परंतु हे सर्व ढहशाश कोणती आहे, यावर अवलंबून असते.
मागील लेखात आपण पाहिले, की सेबीने एकाच वर्गवारीमध्ये सेक्टर फंड आणि थीमॅटिक फंड, या दोन प्रकारांच्या अंतर्भाव केला आहे. त्यापैकी सेक्टर फंडाची माहिती आपण मागील लेखात घेतली. या लेखात थीमॅटिक फंडाबद्दल बोलू!
सेक्टरल फंड आणि डायव्हर्सिफाईड फंड या दोहोंच्यामधील प्रकार म्हणजे थीमॅटिक फंड असे म्हणायला हरकत नाही. सेक्टर फंडातील गुंतवणूक ही एकाच सेक्टरमधील विविध कंपन्यांमध्ये होते. त्यामुळे Diversification हे जे म्युच्युअल फंडांचे प्रधान वैशिष्ट्य आहे, ते सेक्टर फंडांमध्ये दिसून येत नाही. परंतु थीमॅटिक फंड हे एका विशिष्ट Theme ला मध्यवर्ती ठेवून आणले जातात. त्यामध्ये एकापेक्षा अनेक सेक्टर्सचा अंतर्भाव होऊ शकतो.
स्पष्ट कल्पना येण्यासाठी आपण याची काही उदाहरणे पाहूया!
आदित्य बिर्ला सनलाईफ कंपनीचा ABSL Banking and Financial Services Fund नावाचा फंड आहे. हा सेक्टर फंड आहे.कारण या फंडामधील गुंतवणूक Banking and Financial Services या एकाच सेक्टरमध्ये आहे. 87% गुंतवणूक (सेबीच्या नियमानुसार किमान 80%) ही Banking and Financial Services कंपन्यांमध्ये आहे. दुसरे उदाहरण Reliance Pharma Fund §$(AmVm Nippon Pharma Fund ) हाही सेक्टर फंड आहे आणि त्यामधील 99% गुंतवणूक ही फार्मा कंपन्यांमध्ये आहे.
याउलट Mirae Asset या कंपनीचा Mirae Asset Great Consumer Fund नावाचा फंड आहे. हा फंड Consumption या Theme वर आधारित आहे. एकूण 38 कंपन्यांमध्ये या फंडामधील गुंतवणूक विखुरलेली आहे. या 38 कंपन्या या एकाच सेक्टरमधील नसून वेगवेगळ्या 11 सेक्टर्समधील आहेत. ती सेक्टर्स आणि त्या सेक्टर्समधील या फंडांच्या गुंतवणुकीचे प्रमाण खालीलप्रमाणे-
Sr. No. | Sector | Allocation | Percentage |
1. | FMCG | 36 | |
2. | Financials | 20 | |
3. | Consumer Durables | 11 | |
4. | Automobiles | B | |
5. | Construction | 4 | |
6. | Textiles | 4 | |
7. | Communication | 3 | |
8. | Services | 3 | |
9. | Chemicals | 3 | |
10. | Healthcare | 2 | |
11. | Engineering | 1 |
वरील टेबलावरून आपल्या लक्षात येईल की Thematic Fund हे डशलीेीं फंडापेक्षा अधिक व्यापक व विविधांगी असतात. एकापेक्षा अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असल्यामुळे Concentration चा धोका कमी होतो आणि त्यामुळे जोखीमही थोडी कमी होते. परंतु हे सर्व Theme कोणती आहे, यावर अवलंबून असते. Consumption या Theme मध्ये अनेक कंपन्यांचा समावेश आपण करू शकतो. त्यामुळे वरील फंड थोडा अधिक सर्वसमावेशक झाला आणि त्याने परतावाही उत्तम दिला. मागील 7 वर्षात या फंडाने 16.59 टक्के, तर 3 वर्षात 16.64 टक्के इतका परतावा दिला आहे.
परंतु काही वेळा काही फंडांच्या Theme या इतक्या विस्तारित होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या गुंतवणुकीवर मर्यादा पडते. उदाहरणार्थ, Nippan India Power & Infra Fund (पूर्वीचा Reliance) या फंडाचा Portfolio पहिला, तर त्यामधील गुंतवणूक ही विविध 9 सेक्टर्समधील 35 कंपन्यांमध्ये झालेली आहे. परंतु Power and Infra या Theme अंतर्गत Banking, Financials आणि FMCG ही सदाबहार सेक्टर्स येत नसत्यामुळे त्यामध्ये या फंडाची गुंतवणूक झालेली नाही आणि त्यामुळे या फंडाचा परतावाही कमी राहिलेला आहे. मागील 3 वर्षात या फंडाने 4.10 टक्के, तर 7 वर्षांत 8.89 टक्के इतका परतावा दिलेला आहे.
तात्पर्य म्हणजे Thematic Funds हे जरी सेक्टर फंडांपेक्षा थोडे अधिक व्यापक व विविधांगी असले तरी तेही अत्युच्च जोखमीचे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी, प्रथमच गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनी या प्रकारच्या फंडामध्ये गुंतवणूक करू नये. उच्च आर्थिक क्षमता असणार्या, थोडी जोखीम स्वीकारण्याची मानसिकता असणार्या आणि शेअर बाजाराचा थोडा अभ्यास गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीच्या अल्प हिस्सा (कमाल 10 टक्के ) या फंडामध्ये गुंतवण्यास हरकत नाही. तत्पूर्वी फंडाची Them कोणती आहे, बाजारात सध्या कोणते Sector तेजीत आहे, फंडाच्या Portfolio मध्ये कोणत्या कंपन्या आहेत याचा अभ्यास करून एकरकमी गुंतवणूक करावी. दीर्घकाळ गुंतवणुक करू नये.
सध्या भारतात आघाडीवर असणारे Thematic Fund खालीलप्रमाणे आहेत.
Sr. No. | फंड |
1. | Canara Robeco Consumer Trends Fund |
2. | ABSL India Gen Next Fund |
3. | Mirae Asset Great Consumer Fund |
4. | Tata Digital India Fund |
5. | Franklin Build India Fund |