Mon, Jul 06, 2020 05:18होमपेज › Arthabhan › लार्ज कॅप फंड : सलामीचा आश्वासक फलंदाज

लार्ज कॅप फंड : सलामीचा आश्वासक फलंदाज

Last Updated: Dec 02 2019 1:52AM
भरत साळोखे

लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची दुसरीही एक बाजू ध्यानात घेतली पाहिजे. या कंपन्यांचा विस्तार अगोदरच प्रचंड झालेला असतो. त्यामुळे बाजारातील त्यांच्या शेअरचा भावही खूप वर असतो. तो जरी खात्रीपूर्वक परतावा देत असला तरी त्याचा वेग मंद असतो.

तुम्हाला चेतन चौहान, डेव्हिड बून, डेसमंड हेन्स, गॉर्डन ग्रिनीज हे महान सलामीचे फलंदाज आठवतात का? त्यांची खासियत अशी होती, की आपल्या देशाच्या संघाकडून खेळताना ते सलामीला फलंदाजीसाठी यायचे आणि दोन-दोन दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून बसायचे. दोन-दोन दिवस नाबाद राहूनही त्यांची वैयक्तिक धावसंख्या फारशी नसे. परंतु ते आपल्या संघासाठी एक भक्कम पायाभरणी करून द्यायचे.

गुंतवणुकीच्या आघाडीवरचे असे सलामीचे आश्वासक फलंदाज म्हणजे लार्ज कॅप फंडस्. तुम्ही जर प्रथमच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल, तर एखादा उत्तम लार्ज कॅप फंड निवडा आणि त्यामध्ये अवश्य गुंतवणूक करा किंवा तुम्ही मध्यमवयीन अगर ज्येष्ठ नागरिक असाल आणि काही प्रमाणात जोखीम घेऊन बँकेपेक्षा किंवा डेट फंडापेक्षा थोडा अधिक परतावा घेण्याची तुमची मानसिकता असेल, तरी तुम्ही गुंतवणुकीपेक्षा लार्ज कॅप फंडस् निवडू शकता. कारण ीश्रेु रपव ीींशरवू ुळपी ींहश ीरलश या इंग्रजी उक्तीप्रमाणे लार्ज कॅप फंडस् बिनधोकपणे आणि सुरक्षितपणे तुमच्या नियोजनापर्यंत तुम्हाला नेवून ठेवतात. अर्थात इतर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याआधी जी गोष्ट आपण अवश्य लक्षात ठेवतो, ती इथेही लक्षात ठेवणे ओघाने आलेच! आणि ती म्हणजे आपले गुंतवणुकीचे नियोजन किमान पाच वर्षांचे हवे.

लार्ज कॅप फंड म्हणजे काय? तर, सेबीच्या चऋ उरींशसेीळीरींळेप च्या नवीन सर्क्युलरनुसार जे फंड त्यांची किमान 80 टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांमध्ये किंवा लार्ज कॅप कंपन्यांशी संबंधित गुंतवणूक साधनांमध्ये करतात, ते लार्ज कॅप फंड. आता लार्ज कॅप कंपनी कोणती? तर, तिचे बाजारातील भागभांडवल किमान रु. 20,000/- कोटींपेक्षा अधिक आहे ती कंपनी. छरींळेपरश्र डीेंलज्ञ एुलहरपसश किंवा छडए वर ज्या कंपन्यांचे लिस्टिंग झालेले आहे त्यापैकी सर्वात वरच्या 100 कंपन्या या लार्ज कॅप  कंपन्या आहेत आणि लार्ज कॅप फंडातील गुंतवणूक या शंभर कंपन्यांमध्ये झाली पाहिजे, असे सुस्पष्ट निर्देश सेबीचे आहेत.

आता हे लार्ज कॅप फंड इतर इक्विटी फंडांपेक्षा तुलनेने अधिक सुरक्षित का असतात, ते पाहू. कोणत्याही देशातील लार्ज कॅप कंपन्या या ज्यांना आपण इर्श्रीश उहळि कंपन्या म्हणतो त्या असतात. त्या आकाराने तर प्रचंड असतातच परंतु त्याचबरोबर त्यांचा पूर्वेतिहास देदीप्यमान असतो. त्यांची कार्यशैली उच्च दर्जाची असते. त्यांचे ताळेबंद, नफा-तोटा पत्रके यांमध्ये पारदर्शकता असते. भविष्यात करावयाच्या प्रगतीविषयी त्यांच्यापुढे एक तळीळेप असते. आपल्या शेअर होल्डर्सना लाभांशाच्या रूपाने त्या उत्तम परतावा देत असतात. नवीन गुंतवणूकदार संस्था, गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप कंपन्याच पसंत करतात. त्यामुळे लार्ज कॅप कंपनीमधील गुंतवणूक ही निर्धोक समजली जातेे.

परंतु लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची दुसरीही एक बाजू ध्यानात घेतली पाहिजे. या कंपन्यांचा विस्तार अगोदरच प्रचंड झालेला असतो. त्यामुळे बाजारातील त्याच्या शेअरचा भावही खूप वर असतो. तो जरी खात्रीपूर्वक परतावा देत असला तरी त्याचा वेग मंद असतो. त्यामुळे लार्ज कॅप फंड हे इतर मल्टी कॅप फंड, मिड कॅप फंड किंवा स्मॉल कॅप फंड यांपेक्षा कमी असला तरी निश्चित असतो. हे सांगितल्याप्रमाणे तो कमी असला तरी निश्चित असतो. हे झाले र्इीश्रश्र चरीज्ञशीं किंवा बाजाराच्या तेजीच्या काळाबाबतीत! परंतु जेव्हा मंदीच्या काळात किंवा इशरी चरीज्ञशीं मध्ये  बाजार घसरणीला लागतो तेव्हा हेच लार्ज कॅप फंड तटबंदीसारखे आपल्या गुंतवणुकीच्या किल्ल्याचे पडझडीपासून संरक्षण करतात. त्यांच्यातही घट होते. परंतु ती घट मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंडासारखी प्रलयंकारी नसते. त्यामुळे प्रथमच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांनी, फारशी जोखीम नको असणार्‍या गुंतवणूकदारांनी लार्ज फंडांमध्ये कटाक्षाने गुंतवणूक करावी.

एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया ही काही लार्ज कॅप कंपन्यांची नावे जरी वाचली तरी आपली गुंतवणूक कोठे होते, याची कल्पना लार्ज कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍या लोकांना येईल आणि ते आश्वस्त होतील.

मागील 10 वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पाच लार्ज कॅप फंडांची यादी खालीलप्रमाणे आहे.