माझ्या गुंतवणुकीवर परतावा काय?

Last Updated: Nov 04 2019 1:06AM
Responsive image


अनिल पाटील

कित्येक लोक  गुंतवणूक करताना मला परतावा किती मिळणार? याचा विचार करीत नाही किंवा मला किती काळासाठी गुंतवणूक करावयाची आहे? याबाबत स्पष्टता  ठेवत नाहीत, त्यामुळे हे  लोक अल्पकालीन गुंतवणूक करतात. प्रत्येक वेळी ही गुंतवणूक रिन्यूवल करत करत सातत्याने  दीर्घ काळापर्यंत  राहतात. *मिळणारा* **परतावा व दीर्घकाळ**  दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमची जीवन परिपूर्ण हवे असेल! भविष्यात श्रीमंत जीवन जगायचे असेल! तर तुमचा पैसा कामाला लावा! दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करा. बाजारांमधील जोखीम स्वीकारा. तज्ज्ञामार्फत  निरनिराळ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक नियोजन करा.

 जर  10000/- रुपये एकरकमी गुंतवणूक 30 वर्षानंतरच्या आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक करीत असाल तर... आज उपलब्ध गुंतवणूक योजनांचे  विविध दराने  मिळणारा परतावा दीर्घकाळात  तीस वर्षानंतर  होणारी रक्कम ही अवलोकन  करा. बचत खाते 3%  वर्षानुवर्षे  अचानक लागणारी रक्कम ठेवतो मात्र आजपर्यंत कधीही लागलेली नसते. पारंपरिक विमा 6% पीपीएफ बँक पोस्ट, 8%  म्युच्युअल फंड बॅलन्स फंड 12% डायवरसी  फाईड इक्विटी फंड 15% हे वरील सर्व व्याजदर पूर्वी मिळालेले आहेत. वेगवेगळ्या दराने  तीस वर्षात  10000/-  रुपयांचे किती होतात पहा - 

1) 3%  ==   30,000/-  2)6%==  60,000/- 3)8%==  1,01,460/-  4)12%==3,20,000/-5)15%== *8,29,000* /- दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचे नियोजन किती  महत्त्वाचे असते? हे वरील उदाहरण पाहिल्यास बाजारातील जोखीम स्वीकारून आठ पट अधिक पैसा मिळविता येतो. श्रीमंत लोक अशा  ठिकाणी गुंतवणूक करतात अन् सर्वसामान्य लोक जादा व्याजदराच्या आमिषाने आपली गुंतवणूक घालवून बसतात, हे आजचे वास्तव आहे.  म्युच्युअल फंड गुंतवणूक हे बाजाराशी जोखीमयुक्‍त असतात, हे समजावून घ्या व आपले आर्थिक नियोजनाद्वारे गुंतवणूक करा.  
(एस. पी. वेल्थ मॅनेजमेंट, कोल्हापूर)

आधी अनुराग ठाकूर बोलले नंतर अधीर रंजन चौधरी यांनी केली कडी! पीएम केअर्सवरुन लोकसभेत राडेबाजी


सातारा : पोलिस हॉस्‍पिटलमधून दोघांना डिस्‍चार्ज 


जळगाव : कांदा निर्यात बंदी विरोधात राष्‍ट्रवादीचा मोर्चा


वाशिम : मृत कोरोना रुग्ण महिलेच्या अंगावरील दागिने पसार!


सनी लिओनीचा कंगना राणावतला टोला!


जळगाव : चिनावलच्या सुपुत्राने आंतरराष्‍ट्रीय परिषदेत पाकचा बुरखा फाडला


पुणे : 'त्यानंतर'च जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या; अजित पवारांनी केली सूचना


मंत्री, खासदारांच्या वेतन कपातीला राज्यसभेत मंजूरी


वाशिम : अल्पवयीन मुलीचा विनयभंग


दिशा सालियानच्या शेवटच्या कॉलचा खुलासा!