ज्ञानात भर : माणसासारखा चालणारा नरवानर 

Last Updated: Mar 20 2020 8:53PM
Responsive image


दोन पायांवर ताठ चालणे हे मानवी प्रजातीचे वैशिष्ट्य मानले जाते. इतर कोणताही सस्तन प्राणी मागच्या दोन पायांवर ताठ चालत नाही. शास्त्रज्ञांनी आता शोधून काढले आहे, की मानवापूर्वी दानुविअस प्रजातीचा नरवानरही मागच्या दोन पायांवर ताठ चालू शकत होता. सुमारे सव्वा कोटी वर्षांपूर्वी दानुविअस प्रजाती अस्तित्वात होती. वृक्षांवर निवास करणारी ही प्रजाती दोन पायांवर चालू शकत होती. हा निष्कर्ष या प्रजातीच्या जीवाश्म अस्थींचा अभ्यास करून काढण्यात आला आहे. या प्रजातीचे मागचे पाय माणसाप्रमाणे लांब होते. तर हातही एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर जाण्यासाठी पुरेसे लांब होते. दानुविअस प्रजातीमध्ये मानव प्रजाती व नरवानर प्रजाती या दोन्ही प्रजातींचे गुणधर्म होते. टोरंटो विद्यापीठाने हे संशोधन केले आहे.