Wed, Aug 12, 2020 02:41होमपेज › Ankur › महाबलीपूरम

महाबलीपूरम

Last Updated: Jan 11 2020 2:04AM
मामल्लापूरम म्हणजेच महाबलीपूरम हे दक्षिण भारतातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. युनेस्कोने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान असा दर्जा दिला आहे. पल्लव राजांच्या शासनकाळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर व सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र होते. येथे सुमारे 40 प्राचीन वास्तू व मंदिरे आहेत. येथील अखंड दगडात कोरलेली शिल्पे सातव्या शतकाच्या आसपास बनवली गेली. गंगावतरणाचे दगडात कोरलेले शिल्प जगातील सर्वात विशाल शिलाशिल्प आहे. पाच पांडवांचे दगडात कोरलेले रथ, वराह गुहा, विष्णू मंदिर ही येथील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. तिसर्‍या ते नवव्या शतकाच्या काळात मामल्लापूरम पल्लव साम्राज्याची आर्थिक राजधानी होती. पल्लव राजा महामल्ला याच्या नावावरून या स्थानाला महामल्लापूरम हे नाव देण्यात आले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन मामल्लापूरम किंवा महाबलीपूरम हे नाव पडले.