Mon, Oct 14, 2019 21:05



होमपेज › Ankur › भारतदर्शन : अल्लुरी सीताराम राजू

भारतदर्शन : अल्लुरी सीताराम राजू

Published On: Oct 05 2019 12:16AM | Last Updated: Oct 04 2019 7:56PM




भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन नुकताच साजरा झाला. अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले. आंध्रप्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू अशाच स्वातंत्र्ययोद्ध्यांपैकी एक आहेत. 1922 साली ब्रिटिशांनी एका कायद्यान्वये आदिवासी लोकांना जंगलातील साधनसामग्री वापरण्यास व जंगलात पारंपरिक पोडू शेती करण्यास प्रतिबंध केला. अल्लुरी सीताराम राजू आदिवासी नव्हते पण त्यांनी आदिवासी जमातींना एकत्र करून या अन्यायी कायद्याविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्यास सुरुवात केली.

पोलिस ठाण्यांवर हल्ले करणे, शस्त्रे पळवणे अशा कारवाया करून त्यांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. रंपाचे बंड म्हणून प्रसिद्ध अशा उठावास कारणीभूत ठरलेल्या राजू यांना जंगलाचे हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले. 

दुर्दैवाने 1924 सालच्या मे महिन्यात राजू यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले. त्यांच्यावर कोणताही खटला न चालवता त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या महान स्वातंत्र्यसैनिकाची समाधी विशाखापट्टणम् जिल्ह्यातील कृष्णदेवीपेठ गावात आहे.