क्रांतिकारक शोध : ट्रॅफिक सिग्‍नल

Last Updated: Nov 08 2019 8:39PM
Responsive image


1860 चा काळ. मोटारीचा शोध लागायचा होता. लंडन शहरात घोडागाड्या धावत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ब्रिटिश रेल्वेचा एक व्यवस्थापक जॉन नाईटने रेल्वेप्रमाणे रस्त्यांवरही सिग्‍नलचे दिवे वापरण्याचे सुचवले. हा उपाय परिणामकारक ठरला. सुरुवातीला लाल व हिरवे हे दोन दिवेच सिग्‍नलमध्ये होते. 

आज आपण पाहतो ते स्वयंचलित ट्रॅफिक सिग्‍नलबरोबर शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. 1920 साली अमेरिकेच्या डेट्राईट राज्यातील पोलिस अधिकारी विल्यम पॉटस् याने तीन दिव्यांची स्वयंचलित सिग्‍नल यंत्रणा विकसित केली. 
लाल व हिरव्या दिव्यासोबत वेग मंद करण्याची सूचना करणारा पिवळा दिवाही त्याने सिग्‍नलमध्ये सामील केला. आज रहदारीच्या महत्त्वाच्या रस्त्यावर ट्रॅफिक सिग्‍नल आवश्यक बनला आहे. 

नजीकच्या काळात ट्रॅफिक सिग्‍नलला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळणार असून वाहनांची संख्या व वेळ यानुसार सिग्‍नलमधील दिवे चालू बंद होण्याच्या कालावधीत बदल होईल.