Mon, Sep 21, 2020 17:58होमपेज › Ankur › टेरेस फार्मिंग

टेरेस फार्मिंग

Last Updated: Feb 15 2020 12:51AM
‘टेरेस फार्मिंग’ हा आधुनिक प्रकार नाही. प्राचीन इंका लोकांनी टेरेस फार्मिंगची मुहूर्तमेढ रोवली. इंकाभूमीत सपाट जमिनीची कमतरता होती. ही समस्या सोडविण्यासाठी डोंगराळ भागात मातीच्या पायर्‍या तयार करून त्यावर शेती करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तीन प्रकारची पिके या प्रकारच्या शेतीत घेतली जात. मका, कडधान्ये व भाज्यांची लागवड एका खालोखाल केली जात असे. टेरेस फार्मिंगमुळे समान सूर्यप्रकाश सर्व पिकांना मिळत असे. तसेच कमी पाण्यातही पिके घेणे शक्य होत असे. इंकाच्या टेरेस फार्मिंग पद्धतीनुसार अजूनही चीन व दक्षिण पूर्व आशियाई देशात तांदूळ, बार्ली तसेच, मेडिटेरिअन देशात ऑलिव्ह, द्राक्षाची लागवड केली जाते. आसाममधील चहाची लागवड हा टेरेस फार्मिंगचाच प्रकार आहे. 

 "