Fri, Jul 03, 2020 14:58होमपेज › Ankur › स्टेम विषय

स्टेम विषय

Last Updated: Nov 30 2019 1:48AM
लहान मुले चौकस असतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स डढएच) हे चार विषय समजण्याची त्यांची जाणीव मूल एक वर्षाचे होण्याअगोदरपासून सुरू होते. हे चार विषय ज्यांना स्टेम विषय असेही म्हणतात ते मुलांना लहानपणापासून शिकवले गेले पाहिजेत.

त्यामुळे शाळेत गेल्यावर पाठ्यक्रम शिकताना या मुलांना अडचण होत नाही, असा दावा ‘युरोसायंटिस्ट’ नियतकालिकाच्या एका लेखात केला आहे. मुलांचे पालक व त्यांचे शिक्षक यांनी मुलांचे विचार गंभीरपणे ऐकायला हवेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यांना या स्टेम विषयांत हळूहळू पारंगत करायला हवे, असे मत या लेखात मांडले आहे.