Wed, Aug 12, 2020 02:58होमपेज › Ankur › तापमान वाढीनुसार आहार

तापमान वाढीनुसार आहार

Last Updated: Jan 11 2020 2:04AM
जागतिक तापमानात दरवर्षी वाढ होत जाणार हे निश्चित आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार मानवाने या तापमान वाढीनुसार आहारातही बदल करणे गरजेचे आहे. तापमान वाढीमुळे संकटात सापडणारी पिके उदा. मका, गहू, तांदूळ, सोयाबीन यांचे आहारातील प्रमाण कमी करायला हवे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तापमानातील एक अंश सेल्सियस वाढ या पिकांच्या उत्पादनात 3 ते 8 टक्क्यांची घट करेल, असा निष्कर्ष फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने काढला आहे. त्यामुळे कडधान्ये, ब्रोकोली, बटाटे, रताळी, टोमॅटो, वाटाणे, संत्री यांचा आहारात जास्त समावेश करायला हवा, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा बदल शेतीसाठीही फायदेशीर ठरेल, असे त्यांना वाटते. मांस व मत्स्याहारही मानवाने कमी करायला हवा, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.