Wed, Dec 11, 2019 19:25होमपेज › Ankur › अपघातमुक्त महामार्ग

अपघातमुक्त महामार्ग

Last Updated: Nov 30 2019 1:48AM
महामार्ग म्हणजे हायवे म्हटल्यावर एखादा अपघात होणारच. अमेरिकेतील मिशिगन राज्यात मात्र एक महामार्ग आहे, जेथे गेल्या 221 वर्षांत एकही अपघात झालेला नाही. ‘एम-185’ नावाचा हा महामार्ग मिशिगन राज्यातील मॅककिनाक् बेटावर आहे. 1898 साली सरकारद्वारे या महामार्गावर इंजिन असलेले कोणतेही वाहन चालवायला बंदी घालण्यात आली. कार, ट्रक, मोटारसायकली या सर्वांना महामार्गावर बंदी आहे. सामान्य सायकली, घोडागाडी व बैलगाड्यांना मात्र परवानगी आहे. या कठोर नियमांमुळेच या महामार्गावर आजतागायत एकही अपघात झालेला नाही. 

अजूनही हा नियम येथे लागू असून त्याचे सक्तीने पालन करण्यात येते. या महामार्गावर इंजिन असलेली वाहने धावत नसल्यामुळे हा महामार्ग प्रदूषणमुक्तही आहे.