Mon, Sep 21, 2020 12:01होमपेज › Ahamadnagar › शेवगाव तहसीलवर वडार समाजाचा मोर्चा

शेवगाव तहसीलवर वडार समाजाचा मोर्चा

Published On: Jan 06 2018 1:17AM | Last Updated: Jan 05 2018 11:13PM

बुकमार्क करा
शेवगाव : प्रतिनिधी

टेंभुर्णी (जि. लातूर) येथील वडार समाजातील 17 वयाच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या स्थानिक आमदारास सहआरोपी करावे, या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोर्चेकरांची भाषणे झाली. यानंतर तहसीलदार दीपक पाटील व पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निवेदन देण्यात आले.  

अल्पवयीन मुलीवर अत्याचर करून तिचा खून करण्यात आला. तिचा मृतदेहाची अमानुषपणे विटंबना करून तलावात फेकून देण्यात आले. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मुलीवर अत्याचार व खून करणार्‍या नराधांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मृत मुलीच्या घरी जावून आरोपीवरील गुन्हे मागे घेण्यास दबाव आणून गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या स्थानिक आमदारांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. शासनाच्या वतीने पवार कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी करत आरोपींवर त्वरीत कारवाई न झाल्यास जनआंदोलन कऱण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

या आंदोलनामध्ये विजय धनवडे, अंकुश कुसळकर, बापू धनवडे, दीपक कुसळकर, राजू धनवडे, दिलीप सुपारे, महादेव मासाळकर, मुकेश मानकर, विजय धोत्रे, काळू कुसळकर, संदीप कुसळकर, शामराव कुसळकर, रविंद्र म्हस्के, नगरसेवक सागर फडके, सुनिल आहूजा, प्रकाश वाघमारे, राम अंधारे, समीर शेख, रवि सुरवसे, यांच्यासह वडार समाजाचे नागरीक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भरत विटकर, नगरसेवक अशोक आहूजा, दिपाली सुपारे, अँड. सुभाष लांडे, दिनेश लव्हाट, सुनिल रासने, प्रा. किसन चव्हाण, अरुण मुंढे, शब्बीर शेख, दत्ता फुंदे, प्रकाश भोसले, भानुप्रताप गजभिव, वाय.डी कोल्हे, संजय नांगरे आदींची यावेळी भाषणे झाली.