Thu, Sep 24, 2020 11:12होमपेज › Ahamadnagar › शिर्डीतील बेमुदत संप स्थगित

शिर्डीतील बेमुदत संप स्थगित

Last Updated: Jan 21 2020 1:55AM

संग्रहित छायाचित्रशिर्डी : पुढारी ऑनलाईन 

साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वादाने शिर्डीमध्ये बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली होती. हा बेमुदत संपाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शिर्डीच्या ग्रामसभेत संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आज (ता.१९) मध्यरात्रीपासून संप मागे घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (ता.२०) शिर्डी आणि पाथरीच्या ग्रामस्थांची बैठक बोलावली आहे.   

परभणी जिल्ह्यातील पाथरी हे शिर्डीपासून २७५ किमी अंतरावर आहे. ठाकरे यांनी या ठिकाणाला साईंचे जन्मस्थान म्हटले आणि तेथील विकासासाठी 100 कोटींची घोषणा केली. साईंच्या जन्माविषयी कोणतीही स्पष्ट माहिती नसली, तरी ते शिर्डी येथे येऊन राहिले आणि स्थायिक झाले असे म्हणतात. यानंतर शिर्डीचीही ओळख साईंची शिर्डी अशी झाली.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिर्डी गावातील रहिवासी संतप्त झाले आहेत. शिर्डी साई ट्रस्टच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे की त्यांना पाथरीच्या विकासावर कोणताही आक्षेप नाही. परंतु, त्यास साईंचे जन्मस्थान म्हणणे योग्य नाही. यापूर्वीही साई बाबा आणि त्यांच्या पालकांबद्दल बरेच खोटे दावे केले गेले. 

 "