Wed, Aug 12, 2020 08:44होमपेज › Ahamadnagar › मटका अड्ड्यांवर छापे, 16 अटकेत

मटका अड्ड्यांवर छापे, 16 अटकेत

Published On: Dec 27 2018 1:05AM | Last Updated: Dec 27 2018 1:05AM
पाथर्डी : शहर प्रतिनिधी

शहरात चार ठिकाणी चालू असलेल्या मटका अड्ड्यांवर   अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 1 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 16 संशयितांना ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील चार ठिकाणी अवैधपणे मटक्याचे आकडे घेत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना यांना समजली होती.या गुप्त माहितीच्या आधारे मीना यांनी एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक एस.पी.पवार, पोलिस हे कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण,पो.ना.उमेश गोरे, पी.एन.शेलार,दिगंबर तनपुरे, पी.डी.धुमाळ, पी.एन.बोडखे, राहुल बोरुडे, ए. आर.कुलांगे आदींच्या पथकाने शहरातील रामगिरबाबा टेकडी परिसरात,कोरडगाव चौकातील लॉजजवळ,  तर आखारभागमधील दोन खोल्यांमध्ये छापे टाकण्यात आले. यावेळी मटका खेळणार्‍या 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यांच्याकडून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत अमोल कुलकर्णी, आरिफ शेख, प्रकाश भरते, मुजरसम शेख(कसबा, पाथर्डी),दीपक उदबत्ते(भंडार गल्ली,पाथर्डी)विलास कराड, ज्ञानदेव कराड, भानुदास शिरसाठ (आगासखांड),राहुल मगर(कसबा, पाथर्डी),मोहन दहिफळे,अंबादास तांदळे(रा.मोहटा),अमोल खोर्दे(हंडाळवाडी),मुसा शेख,श्रीधर वाळके, लिंबाजी चव्हाण(माळी बाभूळगाव),विष्णू धायतडक(धायतडकवाडी),बाबासाहेब केदार(रा.टाकळीमानूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार अरविंद चव्हाण करीत आहेत.