Sat, Oct 31, 2020 15:00होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात दिवसभरात एकही मृत्यू नाही

नगर जिल्ह्यात दिवसभरात एकही मृत्यू नाही

Last Updated: Oct 28 2020 1:12AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी 316 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 136 इतकी झाली आहे. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 48 हजार 688 रुग्ण बरे झाले असून, 2 हजार 652 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या 41 रुग्णांमध्ये नगर शहर 9, कर्जत 1, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 7, पारनेर 2, पाथर्डी 1, राहाता 5, राहुरी 2, संगमनेर 5, शेवगाव 1, श्रीगोंदे 2, श्रीरामपूर 3, भिंगार 1 रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 91 रुग्ण आढळून आले. यामध्ये नगर शहर 24, अकोले 22, जामखेड 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 6, नेवासे 3, पारनेर 8, पाथर्डी 10, राहुरी 1, संगमनेर 1, श्रीगोंदे 9, मिलिटरी हॉस्पिटल 4 रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 184 जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहर 12, अकोले 9, जामखेड 16, कर्जत 10, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 7, नेवासे 16, पारनेर 4, पाथर्डी 35, राहाता 20, राहुरी 7, संगमनेर 13, शेवगाव 12, श्रीगोंदे 5, श्रीरामपूर 8 रुग्णांचा समावेश आहे.

काल दिवसभरात 434  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये  नगर शहर 81, अकोले 30, जामखेड 29, कर्जत 25, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 6, नेवासे 23, पारनेर 15, पाथर्डी 44, राहाता 24, राहुरी 38, संगमनेर 28, शेवगाव 30, श्रीगोंदे 24, श्रीरामपूर 15, भिंगार 8, मिलिटरी हॉस्पिटल 5 रुग्णांचा समावेश आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 48 हजार 688 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 93.39 टक्के झाले आहे. 

 "