Wed, Aug 12, 2020 21:13होमपेज › Ahamadnagar › वाळू तस्करांवरील कारवाईकडे दुर्लक्ष

वाळू तस्करांवरील कारवाईकडे दुर्लक्ष

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:22PM

बुकमार्क करा

जामखेड : मिठूलाल नवलाखा

जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या वाळू साठे असून याकडे तहसीलचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत वाळू साठे धारकांवर मोठ्या प्रमाणात दंडाच्या नोटीसा दिल्या जातात. परंतु वसूलीमात्र नाममात्र केली जाते. अशी आवस्था आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार गेल्या सहा महिन्यांपासून नाही. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. तालुक्यात फक्‍त आघी येथे 1 हजार 857 ब्रास म्हणजे 56 लाखांचा  लिलाव झाला असून येथेच अधिकृत वाळू साठा आहे.  

जामखेड तहसिल कार्यालयात तत्कालीन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची बदली होवून सहा महिने उलटले त्यानंतर तहसिलदार पदाचा पदभार विजय भंडारी यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू चोरी वाढली. तालुक्यातील धानोरा,वंजारवाडी, पाटोदा,दिघोळ, फक्राबाद, धनेगाव, जवळा, भवरवाडी, काजेवाडी तलाव या परिसरात वाळू साठे आहेत. सर्वांत जास्त वाळू साठे वंजारवाडी, खामगांव शिवारात आहेत.या अवैद्य वाळू साठे धारकांवर 88 लाख 50 हजार दंडाच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. या परिसरात एकूण 354 ब्रास वाळूचे पंचनामे करण्यात आले. त्यापैकी 3 लाख 9 हजार वसूल करण्यात आले. 

तरी देखील त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. या प्रकरणी गाजावाला झाल्यानंतर या परिसरातील अवैद्य वाळू साठे करणार्‍यांना लाखो रूपयांची दंडात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात कोणीही दंड भरला नाही. मात्र गाजावाजा झाल्यानंतर 17 वाहनांवर कारवाई करून यांच्याकडून 4 लाख 2 हजार 343 ऐवढा दंड वसूल करण्यात आला आहे. किंवा अवैद्य वाळूवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. 

आठ दिवसांपूर्वीं मांजरा नदीमध्ये बोटीद्वारे वाळू काढण्याचे काम सुरू होणार होते. ही माहिती कळाल्यानंतरही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. अशा प्रकारे तालुक्यात मोठया प्रमाणात अवैद्य रित्या वाळू चोरी सुरू असताना प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे.  

या अवैद्य वाळू साठयांवर जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून अधिकृत लिलाव करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारला महसूल मिळेल. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावेत, अशी अपेक्षा आहे. 

तालुक्यातील नागरिकांची होणारी कामे वेळेत होताना दिसत नाही. नागरिकांना हेळसांड होताना प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. अनेक महसुल कर्मचारी नागरिकांना व्यवस्थित बोलत पण नाही. 

ही नागरिकांची होणारी हेळसांड होणार नाही साठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करणे आवश्यक आहे. तरच तस्करांवर जरब बसेल व नागरिकांना कामांना वेग येईल.