Thu, Sep 24, 2020 10:28होमपेज › Ahamadnagar › नगर : सीएए विरोधातील सभा उधळून लावण्याचा हिंदुराष्ट्र सेनेचा इशारा 

नगर : सीएए विरोधातील सभा उधळून लावण्याचा हिंदुराष्ट्र सेनेचा इशारा 

Last Updated: Jan 21 2020 1:55AM

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्यालअहमदनगर : प्रतिनिधी 

सीएए व एनआरसी विरोधातील अहमदनगरमध्ये आयोजित सभा उधळून लावण्याचा हिंदुराष्ट्र सेनेने इशारा दिला आहे. सभेला परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी दिले. यावेळी ते बोलत होते. निवेदन दिल्यानंतर कोतवाली पोलिसांनी धनंजय देसाई, जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली आहे.  

अधिक वाचा : साई जन्मस्थळ वाद; मुख्यमंत्र्यांसोबत शिर्डीकरांची आज बैठक

सीएए, एनआरसी आणि केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेस पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना एकवटल्या असून विरोध केला जात आहेत. तर पीएम मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री शहा यांच्यावर टीकाही केली जात आहे. अशीच सभा अहमदनगरमध्ये आयोजित केली आहे. तर दुस-या बाजोला भाजप व उजव्या विचाराच्या संघटन सीएए, एनआरसीचे समर्थन करताना दिसत आहेत.त्याच पार्श्वभूमीवर अमहमदनगर येथे आयोजित डाव्या संघटनांची सभा उधळून लावण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी दिला आहे. तसेच, जमावबंदी आदेश लागू असताना सभा घेतातच कशी, असा सवालही देसाईंनी केला आहे. 

अधिक वाचा : शिर्डीतील बेमुदत संप स्थगित

 "