Mon, Aug 10, 2020 04:53होमपेज › Ahamadnagar › वादग्रस्त छिंदमच्या भावाकडून 'ईव्‍हीएम'ची पूजा!

वादग्रस्त छिंदमच्या भावाकडून 'ईव्‍हीएम'ची पूजा!

Published On: Dec 09 2018 11:51AM | Last Updated: Dec 10 2018 1:10AM
अहमदनगर : प्रतिनिधी

अहदनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. नगरमध्ये मतदानासाठी एकूण ३६७ मतदान केंद्रे आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या भावाने आणखी एक नवा वाद निर्माण केला. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने चक्क ‘ईव्हीएम’ मशीनची पूजा केल्याचा प्रकार समोर आला. मतदान केंद्रामध्ये एक पुजारी व श्रीकांत मशीनची पूजा करत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी श्रीपाद छिंदम हा प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्याची पत्नी प्रभाग क्रमांक १३ मधून रिंगणात आहे. छिंदमच्या विजयासाठी त्याचा भाऊ श्रीकांतने तोफखाना परिसरातील मतदान केंद्रावर ब्राह्मणाच्या हस्ते पूजा केली. मतदान केंद्रावर पूजा केल्याचे समजताच नागरिकांमध्ये आणि इतर उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.