अहमदनगर : वरुडी पठारला वीज पडून शेतकरी ठार

Last Updated: Mar 26 2020 2:25PM
Responsive image
मृत सुनील गणपत फटांगरे


संगमनेर (नगर) : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तालुक्याच्या पठार भागातील वरुडी पठार येथील एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. तर गुंजाळवाडी पठार येथील दोन गाईंचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

वाचा :  नगरमध्ये आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण

पठार भागातील वरुडी पठार, सारोळे पठार, गुंजाळवाडी पठार ,कर्जुले पठार, डोळासणे, जवळे, बाळेश्वर, सावरगाव, घुले, महालवाडी, पोखरी, बाळेश्वर आदी प्रमुख गावांसह सावरगाव तळ, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव, पावसा आदी गावांना चांगलेच झोडपून काढले. अचानक वादळी वाऱ्याचा विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वरुडी पठार येथील सुनील गणपत फटांगरे वय ४५ हे आपल्या शेतामध्ये हरभरा काढत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात घेऊऩ जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

वाचा:  ‘क्वॉरंटाईन’साठी सांस्कृतिक भवन

वरुडी पठार गावाच्या शेजारीच असणाऱ्या गुंजाळवाडी पठार येथील संदीप निवृत्ती भोर व निलेश भाऊसाहेब भागवत या शेतकऱ्यांच्या गाईच्या अंगावर वीज पडून त्या दोघांची प्रत्येकी एक गाय ठार झाली आहे. तसेच वरुडी पठार व गुंजाळवाडी पठार येथे वादळाने अनेक घरांचे कौले, पत्रे उडून गेले आहेत.

वाचा :आदेश जुगारणार्‍यांना पोलिसांचा चोप

संगमनेर तालुक्यातील वरील गावांमध्ये बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे गहू, आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही भागातील गहू आणि हरभरा बरोबरच डाळींब, कांदा, टोमॅटो, आणि भाजीपाला पिकांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.