Sun, Aug 09, 2020 11:48होमपेज › Ahamadnagar › हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू

हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू

Last Updated: Jan 19 2020 2:57PM
अहमदनगर : पुढारी ऑनलाईन 

हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना गिर्यारोहकाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरुण सावंत असे मृत गिर्यारोहकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल (दि. १८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोकण कड्यावरुन गिर्यारोहक अरुण सावंत यांच्यासह चौघे जण रॅपलिंग करताना दरीत कोसळले. या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने सावंत यांचा शोध सुरू करण्यात आला. आज (रविवार दि. १९) दुपारी १२ नंतर सावंत यांचा मृतदेह सापडला. दरम्यान, सावंत यांच्याबरोबर असलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात आले. 

कोकण कड्यावरून रँपलींग करण्यासाठी गिर्यारोहकांची ३० जणांची टीम हरिश्चंद्र गडावर आली होती. या टीमचे नेतृत्व अरुण सावंत करत होते. हरिश्चंद्र गडाचा कोकण कडा ते माकड नाळ या हरिश्चंद्र गडावर गडाचाच एक भाग असलेल्या कड्यापर्यंत त्यांची टीम आधी वरून खाली आणि त्यानंतर आडवे रँपलींग करणार होते. रँपलींगचा पहिला टप्पा जवळपास पुर्ण होत आला होता. अरुण सावंतांसोबत असलेले २९ जण पहिला टप्पा उतरून आले होते. सर्वात शेवटी अरुण सावंत दोरीचा सहाय्याने रँपलींग करत असताना सायंकाळी पाच वाजता नाहीसे झाले. तेव्हापासून अरुण सावंत यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता.