Tue, Aug 11, 2020 21:39होमपेज › Ahamadnagar › संगमनेर : कंटेनर-कारच्या अपघातात तीन ठार

संगमनेर : कंटेनर-कारच्या अपघातात तीन ठार

Last Updated: Oct 10 2019 1:21PM
संगमनेर: प्रतिनिधी

नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील क-हे घाट परिसरत कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार दि. १०) पहाटेच्या सुमारास घडला. गणेश सुभाष दराडे, श्रीकांत बबन आव्हाड, अजय श्रीधर पेदाम असे अपघातात ठार झालेल्या तिघा जणांची नावे आहेत. 

मृत तिघेजण कारने नांदुर-शिंगोटे येथून संगमनेरच्या दिशेने जात होते. त्यावेळी कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्यांची कार पुढून येणा-या कंटेनरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती समजताच वाहतूक शाखेचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलिस निरिक्षक सुनील पाटील यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या मृत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. अपघातामुळे पुणे-नाशिक महमार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.