Wed, Feb 19, 2020 13:13होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक ठार

अहमदनगर : बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक ठार

Last Updated: Feb 14 2020 3:58PM

संग्रहितअहमदनगर : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर तालुक्यातील लष्कराच्‍या युद्ध सरावक्षेत्राला लागून असलेल्या खारेकर्जुने गावात बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक जण ठार झाला. भिवा सहादू गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी के.के. रेंज हद्दीत माळरानावर घडली. येथे रणगाड्यांतून दारूगोळे डागण्याचे प्रशिक्षण चालते. डागल्यानंतर निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

►पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

मात्र, खारेकर्जुने येथील काही ग्रामस्थ  ठेकेदार व सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्ब गोळा करत असतात. असाच प्रकार आज येथे घडला.

►साहेब, पोटचं पोरगं सांभाळत नाही हो!

निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी येथील भिवा गायकवाड गेला होता. त्याला भरलेला बॉम्ब सापडला. त्याने तो माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात भिवाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत आशा दहा घटनांत अनेक जणांचा मृत्यू व अनेक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.