Thu, Jan 21, 2021 17:26
राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणुकीसाठी दोन राजकीय गट आले एकत्र, पण तरुणांच्या गटाने दिले आव्हान

Last Updated: Jan 14 2021 1:10PM

अण्णा हजारेपारनेर (नगर) : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत (Ralegan Siddhi gram panchayat election) गावातील दोन प्रमुख राजकिय पक्षांचे गट एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. या गटांच्या एकत्रीत पॅनलला तरूणांच्या गटाने आव्हान दिले आहे. राजकीय गटांच्या पॅनलच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत सात जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, गावाचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीत तटस्त भूमिका घेतली आहे.

वाचा : नाशिकच्या उमरणेत सरपंचांसाठी लागली तब्बल २ कोटींची बोली, आयोगाकडून निवडणूकच रद्द  

आ. निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुकीची साद घातल्यानंतर अण्णा हजारे यांनीही या भुमिकेचे स्वागत केले. हजारे तसेच आ. लंके यांच्या आवाहनानुसार राळेगणसिद्धीतील जयसिंग मापारी तसेच लाभेश औटी या दोन्ही राजकीय पक्षांच्या गटांनी एकत्र येत बिनविरोध निवडणुकीचा फॉर्म्युला आ. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निश्‍चित केला. त्यानंतर हजारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीतही त्यावर शिक्कामोर्तब झाले.

वाचा : 'ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कामगारांना पगारी सुट्टी द्यावी'

राजकीय गटांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप करून राळेगणसिद्धीतील तरूणांच्या गटाने हजारे यांची भेट घेऊन आम्हालाही ग्रामपंचायतीमध्ये संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यावर राजकिय पक्षांशी एकमत होणार नसेल तर लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्याचा सल्ला हजारे यांनी दिला. निवडणुकीत मतदार ज्यांच्या बाजून कौल देतील तो सर्वांनी मान्य करण्याची सुचनाही हजारे यांनी केली. त्यानुसार राळेगणसिद्धीत सात जागांसाठी मतदान होत असून आतापर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.

अण्णा हजारे यांनी सन १९७५ मध्ये गावामध्ये कामास सुरूवात केल्यापासून सन २०१० पर्यंत गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडत होती. त्यानंतर मात्र राजकिय गटांमध्ये एकमत न झाल्याने लोकशाही मार्गाने निवडणुका पार पडल्या आहेत.

वाचा : पैरा फेडला! आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंना दिली नवीन चप्पल

राळेगणसिद्धी व हिवरेबाजारच्या निवडणुकीतील मुलभूत फरक

सध्या राळेगणसिद्धी तसेच हिवरे बाजार ग्रामपंचयतींच्या निवडणुकांची राज्यभर चर्चा सुरू असून दोन्ही गावांमधील निवडणुकीतील मुलभूत फरक म्हणजे निवडणूकील नेतृत्वाचा आहे. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार हे स्वतः निवडणुकीचे नेतृत्व करीत आहेत. यापूर्वीही ते बिनविरोध निवडणुकीत सदस्य म्हणून निवडूण येत होते.
राळेगणसिद्धीमध्ये मात्र अण्णा हजारे यांनी निवडणूक प्रक्रियेत कधीही हस्तक्षेप केला नाही. ग्रामसभेने निवडलेले सदस्य बिनविरोध विजयी होत असतं. निवडणूक प्रक्रिया पार पडत असतानाही हजारे यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर हजारे यांनी पराभूत उमेदवारांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करून निवडणुकीमध्ये निर्माण झालेली कटूता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वाचा : 'कुणी आरोप केला म्हणून धनंजय मुडेंचा राजीनामा घेणार नाही'

दोन्ही राजकीय गट एकत्रित प्रचारात...

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन्ही गटांनी एकत्रित पॅनल तयार करून ते मतदारांपुढे गेले आहेत. प्रचारात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. दोन्ही राजकीय गट एकत्र आल्याने या निवडणुकीत राजकीय गटांच्या पॅनलचीच एकतर्फी सरशी होण्याची चिन्हे आहेत. 

वाचा : 'धनंजय मुंडेंवरील आरोप प्रकरणी शरद पवार घेतील निर्णय