Sat, Jul 11, 2020 09:32होमपेज › Ahamadnagar › चिंचपूर पांगूळच्या विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान 

चिंचपूर पांगूळच्या विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान 

Last Updated: Jul 02 2020 7:54AM
चिंचपूर पांगुळ :  पुढारी वृत्तसेवा

येथील वारकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे यांची यावर्षीच्या आषाढ एकादशीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत महापूजेसाठी देवस्थान ट्रस्ट समितीतर्फे चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. विठ्ठल बडे हे गेल्या 70 वर्षांपासून नित्यनेमाने प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून विठ्ठल मंदिर येथे अखंड वीणा वाजवण्यासाठी सेवा देत आहेत. बडे यांच्या घरात चार पिढ्यांपासून पंढरीचे वारकरी म्हणून परंपरा आहे. त्यांच्या परिवारातील सर्वच सदस्य हे पूर्वीपासून विठ्ठल भक्त म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. बडे यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्याला विठ्ठलाच्या दारी महापूजेसाठी मानाचे मोठे स्थान प्रथमच मिळाले आहे.  नगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यात वार्‍यासह ही बातमी समजताच वारकारी संप्रदायात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. 

भक्तीला पांडुरंग पावला

बाबांची निवड झाल्याने आम्हाला अत्यानंद झाला आहे.आमच्या पिढीतील  आजोबा, पणजोबा, आद्य वारकरी नामदेव बाबा यांच्यापासून सर्व वारकरी कुटुंंबाच्या भक्तीला पांडुरंग पावला, अशी प्रतिक्रिया विठ्ठल बडे यांचे नातू रामदास बडे यांनी दिली.