Wed, Aug 12, 2020 09:10होमपेज › Ahamadnagar › नेवाशातून सव्वा दोन लाखांची चोरी

नेवाशातून सव्वा दोन लाखांची चोरी

Published On: Jul 04 2019 1:56AM | Last Updated: Jul 04 2019 12:57AM
नेवासा : प्रतिनिधी 

येथील शिक्षक कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घर फोडून दीड लाख रुपये व चार तोळे तीन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 2 लाख 13 हजार पाचशेचा ऐवज चोरून नेला. ज्ञानेश्वर शुक्रे यांच्या फियादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षक कॉलनीत राहणारे ज्ञानेश्वर जयराम शुक्रे हे आपली पत्नी, मुली, जावई, नातवांसमवेत दि.1 जुलै रोजी दुपारी पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते. दि.2 जुलै रोजी सकाळी शेजारी राहणारे मोहन गुजर यांनी शुक्रे यांना फोनवरून घराचे कुलूप तोडल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रे परिवारासह घरी आले असता घराचे सेफ्टी डोअरला व आतील दरवाजाला लावलेले लॉक तोडलेले दिसले. लाकडी कपाटाचे लॉक तोडून दीड लाख रुपये रोख रक्कम व 63 हजार पाचशे रुपयांचे 43 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 2 लाख 13 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे ज्ञानेश्‍वर शुक्रे यांन फिर्यादीत म्हटले आहे.