Mon, Sep 21, 2020 18:41होमपेज › Ahamadnagar › तपासाचा अधिकार राज्य सरकारचाच : थोरात

तपासाचा अधिकार राज्य सरकारचाच : थोरात

Last Updated: Feb 15 2020 12:52AM

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातआश्वी : पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे आणि तो राज्य शासनाकडे आसावा. यावर महाविकास आघाडीचे सरकार ठाम  असल्याचे रोखठोक मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

कोरेगाव भीमाचा तपास  एनआयएकडे देण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सहमती दिल्याने आता शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे  महाविकास आघाडीमध्ये नाराजी वाढली आहे का? असा प्रश्न ना. थोरात यांना  विचारला असता ते  म्हणाले की, जर  मुख्यमंत्र्यांनी खरच  परवानगी दिली असेल तर त्यावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते चर्चा  करतील. परंतु  आज हा तपास झाला तर उद्या एखादी केंद्र सरकारची  वेगळी एजन्सी येऊन तपास  करेल. हे असे झाले तर ते राज्य सरकारसाठी  योग्य नसल्याचे  त्यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजप सरकारच्या आशिर्वादाने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेेले राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रचार, प्रसार करत आहेत. याबाबत विचारलेे असता ना. थोरात म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यान त्या प्रकारे कुठेंन कुठे जाऊन आपला प्रचार करण्याचे काम करत आहे, हे चुकीचे आहे. पुणे विद्यापीठ हे  विद्येचे माहेरघर आहे आणि  या विद्यापीठात  तरी स्वयंसेवक संघाने असे न करता  राज्यघटनेला अभिप्रेत  असलेल्या तत्त्वज्ञानावर विचार व चर्चा करायला  हवी आहे.  त्यामुळे या विद्यापीठात तरी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार  होणार नाही, यावर   राज्यसरकार ठाम असल्याचे थोरात यांनी ठणकावून सांगितले. 

भाजपने महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी मिशन फाटाफूट सुरु केल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर या प्रश्नावरून  शिवसेनेला घेरले होते. मात्र आता मध्य प्रदेशात  छत्रपती शिवाजी महाराजांचा  पुतळ्यावरून  मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेस सरकारलाच  जाब विचारला आहे? याबाबत विचारले असता ना. थोरात म्हणाले की, मागे स्वातंत्र्यवीर सावरकर  या प्रश्नावरून शिवसेनेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला. यावरून मध्यप्रदेश मधील  काँग्रेसच्या सरकारला भारतीय जनता पार्टी जाणून-बुजून अडचणीत आणून या सर्व प्रश्नाचा गैरफायदा घेत  राजकारण करण्याचे   काम करत असल्याची टीका  करून  याबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. अजून खुलासा करण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांनी भाजपला ठणकावून  सांगितले. 

 "