Mon, Nov 30, 2020 14:07होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : शनिमंदिर भाविकांसाठी खुले

अहमदनगर : शनिमंदिर भाविकांसाठी खुले, भाविकांसह व्यावसायिकांमध्ये उत्साह 

Last Updated: Nov 16 2020 7:57PM
घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे शनिदेवाचे दर्शन गेले आठ महिने बंद होते. राज्यसरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवत आजपासून  (दि.१६) शनिमंदिर भाविकांसाठी खुले झाले. अनेक भाविकांनी पहिल्याच दिवशी शनिमूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सुरक्षा अधिकारी व विश्वास्थ बसून नियोजन करताना पहावयास मिळाले. शनिदेवाचे दररोज ६००० भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

नो मास्क, नो दर्शन!

रविवारी (दि.१५) रात्री देवस्थानचे व्यवस्थापकीय अधिकारी व विश्वस्तांची बैठक पार पडली. त्यात मंदिर सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मंदिर आज भाविकांसाठी खुले झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिमंदीर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक शनिभक्तांना हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि मास्क वापरणे अनिवार्य आहे. स्वयंभू मूर्तीपर्यंत पूजा साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली असून फक्त तेल नेता येणार आहे.

अहमदनगर : सोनाराकडून लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला अटक

शनिमंदिर दर्शनासाठी खुले झाले असल्याने पहिल्याच दिवशी भाविक दर्शनासाठी आले होते. परंतु दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती. मंदिर खुले झाल्याने अनेक महिन्यापासून बंद असलेले दुकानाची व्यवसाईकांनी उघडून साफसफाई केली. व्यवसाय सुरू झाल्याने व्यवसाईकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

अनेक महिन्यापासून दुकाने बंद असल्याने संपूर्ण अर्थचक्र बंद पडले होते. मंदिर सुरू झाल्याने सर्व व्यवसाईकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे. 
- रामकिसन ढगे 
  व्यवसायिक, शनिशिंगणापूर