Wed, Aug 12, 2020 09:33होमपेज › Ahamadnagar › सर्पदंशामुळे राजापुरात शाळकरी मुलाचा मृत्यू

सर्पदंशामुळे राजापुरात शाळकरी मुलाचा मृत्यू

Published On: Aug 21 2019 1:30AM | Last Updated: Aug 20 2019 11:47PM
संगमनेर : प्रतिनिधी

तालुक्या तील राजापूर येथील शेतकर्‍याच्या  मुलाला सर्पदंश होऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल  घडली.

वडझरी येथील गंगाधर कारभारी वेताळ हे  राजापूर येथे बबन काशिनाथ हासे यांच्याकडे शेती वाट्याने करण्यासाठी कुटुंयिीांसह आले आहेत. सध्या त्यांचा मुलगा साहिल हा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे.

दरम्यान, सोमवारी साहिल यास अचानक सर्पदंश झाला. ही माहिती त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास तात्काळ संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.तेथून ढील उपचारासाठी त्यास नाशिक येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना साहिलचा मृत्यू झाला. या घटनेने राजापूर व वरझडी परिसरातील शेतकर्‍यांमधून शोक व्यक्त केला जात आहे.