Tue, Jun 02, 2020 05:12
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › मातृशोक बाजूला सारून संगमनेरचे प्रांताधिकारी कर्तव्यावर हजर  

मातृशोक बाजूला सारून संगमनेरचे प्रांताधिकारी कर्तव्यावर हजर  

Last Updated: Mar 28 2020 4:39PM
संगमनेर :पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील कर्मचारी कोरोना सारख्या जागतिक संकटाचा समर्थपणे सामना करत आहेत. संपूर्ण राज्य लॉकडाऊन असताना हे कर्मचारी त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. हे अधिकारी आपले घरची सर्व कर्तव्ये बाजूला ठेवून काम करत आहेत. याचे आदर्श उदाहण म्हणजे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे. 

कोरोनाच्या लढाई लढत असतानाच संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मातोश्री विमल मंगरूळे यांचे नाशिक येथे  निधन झाल्याची वार्ता धडकली. प्रांताधिकारी मंगरुळे यांच्यवर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यातूनही  जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देत ते आपल्या गावी रवाना झाले. 

पण, त्यांनी आपल्या आईचे अंत्यविधीचे कार्य दोन दिवसात पूर्ण करत पुन्हा संगमनेर गाठले. या कठिण काळात आपल्या कार्याला महत्व देण्याच्या या मंगरुळे यांच्या कार्यदक्ष वृत्तीचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगरुळे यांचे कौतुक करत त्यांना खरे हिरो आणि कोरोना फायटर असे संबोधले. ते म्हणाले, 'संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या आईंचे निधन झाले. अंत्यविधी आटोपून, स्वतःचे दुःख बाजूला सारून ते तातडीने सेवेत रुजू झाले. व्यक्तिगत दुःखातही कर्तव्याला प्राधान्य देणारे असे अधिकारी आणि कर्मचारी ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे.'